गीत:- केस माझे हे जेव्हा गळू लागले
गीतकार:- महाकवी वामनदादा कर्डक
सौजन्य:- अजय वीर
केस माझे हे जेव्हा गळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले
केस माझे हे जेव्हा गळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले
केस माझे हे जेव्हा गळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले
***संगीत***
जात होतो पुढे गात होतो पुढे
पंख पसरीत गेलो मी ज्योती पुढे
***
बाग मागे आणि आग होती पुढे
पंख पसरीत गेलो मी ज्योती पुढे
पंख सारेच तेथे जळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले
केस माझे हे जेव्हा गळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले
***संगीत***
एक सेवक होऊनी सेवा दिली
लोक उलटूनी म्हणतात केव्हा दिली
***
एक सेवक होऊनी सेवा दिली
लोक उलटूनी म्हणतात केव्हा दिली
बोल उलटे हे जेव्हां मिळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले
केस माझे हे जेव्हा गळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले
***संगीत***
गोडी होती मधाची मला जोवरी
लाख लटकून होते मोहोळा परी
***
गोडी होती मधाची मला जोवरी
लाख लटकून होते मोहोळा परी
संपता अर्क सारे पळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले
केस माझे हे जेव्हा गळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले
***संगीत***
काल वामन परी पेरण्या ही कला
येत होते आणि नेत होते मला
***
काल वामन परी पेरण्या ही कला
येत होते आणि नेत होते मला
जाणे माझे हे तेथे टळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले
केस माझे हे जेव्हा गळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले
केस माझे हे जेव्हा गळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले
***
सौजन्य:- अजय वीर