menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Tarun Aahe Ratra Ajuni

Asha Bhosle huatong
seanymanhuatong
Lyrics
Recordings
तरुण आहे रात्र अजुनी

तरुण आहे रात्र अजुनी

राजसा निजलास का रे?

राजसा... निजलास का रे

एवढ्यातच त्या कुशीवर

तू असा वळलास का रे

तरुण आहे रात्र अजुनी

अजुनही विझल्या न गगनी

तारकांच्या दीपमाला

अजुनही विझल्या न गगनी

तारकांच्या दीपमाला

अजुन मी विझले कुठे रे

हाय ! तू विझलास का रे

राजसा... निजलास का रे

तरुण आहे रात्र अजुनी

चांदण्याला काय सांगू

सांग, ह्या कोजागिरीच्या

चांदण्याला काय सांगू

उमलते अंगांग माझे

आणि तू मिटलास का रे

तरुण आहे रात्र अजुनी

बघ तुला पुसतोच आहे

बघ तुला पुसतो च आहे

पश्चिमेचा गा र वारा

बघ तुला पुसतो च आहे

पश्चिमेचा गा र वारा

रातराणीच्या फुलांचा

गंध तू लुटलास का रे

तरुण आहे रात्र अजुनी

उसळती हुदयांत माझ्या

अमृताच्या धुंद लाटा

उसळती हुदयांत माझ्या

अमृताच्या धुंद लाटा

तू किना यासारखा पण

कोरडा उरलास का रे

राजसा... निजलास का रे

तरुण आहे रात्र अजुनी

राजसा.. निजलास का रे

More From Asha Bhosle

See alllogo