menu-iconlogo
logo

Ananta Tula Kase Re Stavave

logo
Lyrics
अनंता तुला ते कसे रे स्तवावे

अनंता तुला ते कसे रे नमावे

अनंत मुखांचा शिणे शेष गाथा

नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा

स्मरावे मनी त्वत्पदा नित्य भावे

उरावे तरी भक्तिसाठी स्वभावे

तरावे जगा तारुनी मायताता

नमस्कार साष्टांग श्री साईनाथा

वसे जो सदा दावया संत लीला

दिसे अज्ञ लोकापरी जो जनाला

परी अंतरि ज्ञान कैवल्यदाता

नमस्कार साष्टांग श्री साईनाथा

बरा लाधला जन्म हां मानवाचा

नरा सार्थका साधनीभुत साचा

धरु साईप्रेमा गळाया अहंता

नमस्कार साष्टांग श्री साईनाथा

धरावे करी सान अल्पज्ञ बाला

करावे आम्हा धन्य चुंबोनि घाला

मुखी घाल प्रेमे खरा ग्रास आता

नमस्कार साष्टांग श्री साईनाथा

सुरादिक ज्यांच्या पदा वंदिताति

सुरादिक ज्यांचे समानत्व देती

प्रयगादि तीर्थेपदि नम्र होता

नमस्कार साष्टांग श्री साईनाथा

तुझ्या ज्या पदा पाहता गोपबाली

सदा रंगली चित्स्वरुपि मिळाली

करी रासक्रीड़ा सवे कृष्णनाथा

नमस्कार साष्टांग श्री साईनाथा

तुला मागतो मागणे एक द्यावे

करा जोडितो दिन अत्यंत भावे

भवि मोहनीराज हा तारी आता

नमस्कार साष्टांग श्री साईनाथा