menu-iconlogo
logo

Krishna Janmala

logo
Letras
झगामगा झगामगा रात सजली

पावसाच्या सरीतून आली बिजली

झगामगा झगामगा रात सजली

पावसाच्या सरीतून आली बिजली

टकामका टकामका बाळलिला

दे गं सखी दे गं झोका पाळण्याला

ढगांच्या आडून चंद्र हासला

आकाशी ता-यांनी रास रंगला

कृष्ण जन्मला बाई कृष्ण जन्मला

कृष्ण जन्मला बाई कृष्ण जन्मला

बेधुंद श्वासांना चढली नशा

नसानसांतून घुमे ढोल ताशा

बेभान श्वासांना चढली नशा

नसानसांतून घुमे ढोल ताशा

माहौल बस्तीचा वेडापिसा

झुलत्या पताकांनी नटला दिशा

लगबग लगबग चाले अंगणी

लागू नये दुष्ट, तीट लावली कुणी

टकामका टकामका बाळलिला

दे गं सखी दे गं झोका पाळण्याला

ढगांच्या आडून चंद्र हासला

आकाशी ता-यांनी रास रचला

कृष्ण जन्मला बाई कृष्ण जन्मला

कृष्ण जन्मला बाई कृष्ण जन्मला

विसरून जाऊ सारी बंधने

तालात एका सारी स्पंदने

विसरून जाऊ सारी बंधने

तालात एका सारी स्पंदने

मस्तीच्या झोकात आनंदाने

नाचून गाऊन रमवू मने

गरागरा गरागरा फेर धरती

वेड्या उधाणाला आली भरती

टकामका टकामका बाळलिला

दे गं सखी दे गं झोका पाळण्याला

ढगांच्या आडून चंद्र हासला

आकाशी ता-यांनी रास रचला

कृष्ण जन्मला बाई कृष्ण जन्मला

कृष्ण जन्मला बाई कृष्ण जन्मला

झील…

हे….मोहन मुरलीधर … नटखट गिरीधर…. सांग तरी कुठवर… पुकार तुला

अपराध झाले फार… पाप वाढे भारंभार… कराया ये उद्धार… साकडे तुला

तूच शाम तूच राम… नरसिंव्ह परशुराम…घ्यावा पुन्हा अवतार…तसाच भला

हात देई मदतीला… साथ घावी सोबतीला… काळरातीला मार्ग दावी आम्हाला…