menu-iconlogo
logo

Ekach Ya Janmi Janu

logo
Letras
आलाप ..

मनाच्या तळयावरती आठवांचे पक्षी आले.

तुझ्या जुन्या पाऊलखुणा,

त्यात माझे ठसे ओले.

तळहाती तुझ्या माझ्या

सारख्याच रेषा रेषा ..

दोन सावल्यांची जणू एक बोली एक भाषा ..

आभाळाची ओढ लागे,उडे मनाचे पाखरू..

पुन्हा पुन्हा जन्मते

मी, एकाच ह्या जन्मी जणू

एकाच ह्या जन्मी जणू...

Ekach ya janmi janu

एकाच ह्या जन्मी जणू

गायिका वैशाली सामंत

गीतकार – अश्विनी शेंडे

संगीत – निलेश मोहरीर

सुखाच्या कळ्या हाती,ओंजळीत नाव तुझे

तुझी मला चाहूल उगा,आभासांचे गाव नवे ..

सुखाच्या कळ्या हाती,ओंजळीत नाव तुझे

तुझी मला चाहूल उगा,आभासांचे गाव नवे ..

चांदराती शोधते मी तुझा एक ध्रुवतारा

तुझे स्पर्श जागवे हा,पहाटेचा गूढ वारा ..

ओ ..तुझ्या पापण्यांचे गाणे

स्वप्न लागते गुनगुनू ..

देह तुझा मन माझे , एकाच या जन्मी जणू ..

एकाच या जन्मी जणू ..

आलाप ..

क्षणांच्या अबोल वाती मालवून जाते कुणी

तुझा स्पर्श आणेल पुन्हा,

आर्जवांची जुनी गाणी

क्षणांच्या अबोल वाती मालवून जाते कुणी

तुझा स्पर्श आणेल पुन्हा

आर्जवांची जुनी गाणी

ओळखीचे अनोळखी एक नाव ओठांवर...

सुख ऊतू जाता जाता थांबले रे काठावर

ओ... इथे तुला शोधताना कसे मी मला सावरू

जन्म सात जगले मी , एकाच या जन्मी जणू

एकाच या जन्मी जणू ...