युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ऐसा सावळा देव विठोबा
पुंडलिका हट्टापायी जो उभा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ओवाळु त्यास पंचारती घेऊन
त्रयलोक्कीचा राणा भूवैकुंठीचा
जय देव जय देव जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
हरि पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा
जय देव जय देव
जय देव जय देव
जय देव जय देव
जय देव जय देव
आ आ विठुनामाच्या तालावरी वाजे
हृदयाचा ठेका धरूनी मृदंग
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
संतांच्या बोला परी ती अखंड
चंद्रभागा वाहे बनुनी अभंग
सकलजनांचा तुच गा दाता
पाऊली तुझीया ठेवीतो माथा
चरणी लीन होऊनी गातो
उद्धार कर गा पंढरीनाथा
जय देव जय देव
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
हरि पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा
जय देव जय देव
जय देव जय देव
जय देव जय देव
जय देव जय देव
तुझ्या कृपेची राहुदे छाया
आर्धव ऐक बा पंढरीराया
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे हे
भक्तिरसात भिजू दे काया
माऊली तुझी अगाध ग माया अलंकापुरी तुझी कृपाळा
पुण्यभूमीचा तू राणा सावळा
आस दर्शनाची लागे साधका
समोरी ये गा वैकुंठनाथा
जय देव जय देव
जय देव जय देव
जय देव जय देव जय पांडुरंगा
हरि पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा
जय देव जय देव
जय देव जय देव
जय देव जय देव
जय देव जय देव