कोरस शेतीबागा माडाची गं वाडी
कोरस नवरीला घुंगराची गाडी
कोरस जशी राजा रानीची गं जोडी
कोरस नवरीला चांदण्याची साडी
सुन्या सुन्या मनामध्ये… सूर हलके
नव्या जुन्या आठवणी… भास परके
दारी सनईचे सूर… दाटे मनी हूर हूर
चाले विरहाचा पुढे वारसा…
कोरस फुलमाळा मंडपाच्या दारी
कोरस झालरींना सुखाच्या किनारी
कोरस नवी नाती ओळखीची सारी
कोरस सपनांची दुनिया गं न्यारी
भावनेची तोरणे… वेदनेच्या झालरी
नाद करिती चौघडे… वाढते घुसमट उरी
ओळखीचे चेहेरे… मी अनामिक एकटी
संपले सारे दुवे…
पुरुष अन आस ही सरली
पुरुष गाव माझा दूर आला आसवांचा पूर
पुरुष प्रेम नव्याने का देई यातना…
कोरस हळदीने सजली गं काया
कोरस सासरची मिळेल गं माया
कोरस वेड लावी धन्याची गं भेट
डोळ्यातल्या काजळाची तीट
तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव
विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपतेः तेंघ्रिऽयुगं स्मरामि
आठवांचे कुंचले… रेखिती काटेकुटे
कोरडे तळहात हे… मेंदीची वर जळमटे
मोकळ्या माथ्यावरी… देवळाची पायरी
फितूर झाली दैवते…
पुरुष रीत ही कुठली
पुरुष दैव मानी हार आली बंधनाला धार
पुरुष भोवती निराशेचा उडे पाचोळा
शेतीबागा माडाची गं वाडी
नवरीला घुंगराची गाडी
जशी राजा रानीची गं जोडी
नवरीला चांदण्याची साडी