जिव उताविळ धीर तुझ्यावीन क्षणभर राहेना
आज तुझ्यातच विरघळू देना मिठीत तू घेना
अनवट उरी आग ही तग मग अशी लावते
उधळून मी टाकले तनमन येना...
वेड तुझा विरह वनवा वेड तुझा प्रणय हळवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला..( 2x )
नकळत देहातली थरथर जागती
अंतव श्वासातला परीमळ मागती
जडले हळवेसे मन होई लाजरे
नयनी फुललेले सुख होई साजरे
अनवट उरी आग ही तग मग अशी लावते
उधळून मी टाकले तनमन येना...
वेड तुझा विरह वनवा वेड तुझा प्रणय हळवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला..( 2x )