•<>•
जीव झाला येडापिसा रात रात जागणं
पुरं दिसभर तुझ्या फिरतो माग मागनं
*
जीव झाला येडापिसा रात रात जागणं
पुरं दिसभर तुझ्या फिरतो माग मागनं
जादू मंतरली कुणी सपनात जागंपणी
नशिबी भोग असा दावला
(तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला)
(तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला)
(मागं पळून पळून वाट माझी लागली)
(अन तू वळूनबी माझ्याकडं पाह्यना)
•<>•
हेहे भिरभिर मनाला या घालू कसा बांध गं
अवसची रात मी अन पुनवचा तू चांद गं
*
एहे भिरभिर मनाला या घालू कसा बांध गं
अवसची रात मी अन पुनवचा तू चांद गं
नजरंत मावतिया तरी दूर धावतिया
मनीचा ठाव तुझ्या मिळंना
(हाता-तोंडा म्होरं घास तरी गिळंना)
(गेला जळून जळून जीव प्रीत जुळंना)
(सारी ईस्कटून जिंदगी मी पाहिली)
(तरी झाली कुठं चूक मला कळंना)
•<>•
अचूक स्क्रोलिंग लिरिक्स परफेक्ट कराओके अपलोडर-
VijayRaje_ßђ๏รคɭє
•<>•
सांदी कोपऱ्यात उभा एकला कधीचा
लाज ना कशाची तक्रार न्हाई
भास वाटतोया हे खरं का सपान
सुखाच्या या सपनाला दार न्हाई
*
सांदी कोपऱ्यात उभा एकला कधीचा
लाज ना कशाची तक्रार न्हाई
भास वाटतोया हे खरं का सपान
सुखाच्या या सपनाला दार न्हाई
एहे राख झाली जगण्याची हाय तरी जीता
भोळं प्रेम माझं अन भाबडी कथा
बघ जगतूया कसं साऱ्या जन्माचं हसं
जीव चिमटीत असा घावला
(तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला)
(तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला)
(मागं पळून पळून वाट माझी लागली)
(अन तू वळूनबी माझ्याकडं पाह्यना)
•<>•
हे खरकट्या ताटावर रेघोट्याची झालर
हातावर पोट बिदागिची झुणका भाकर
*
हेऐ खरकट्या ताटावर रेघोट्याची झालर
हातावर पोट बिदागिची झुणका भाकर
उन्हा तान्हात भूका घसा पडलाय सुका
डोळ्यातलं पाणी तरी खळंना
(हाता-तोंडा म्होरं घास तरी गिळंना)
(गेला जळून जळून जीव प्रीत जुळंना)
(सारी ईस्कटून जिंदगी मी पाहिली)
(तरी झाली कुठं चूक मला कळंना)
•<>•