menu-iconlogo
huatong
huatong
prahlad-shinde-ambabaicha-udo-udo-cover-image

Ambabaicha Udo Udo

Prahlad Shindehuatong
rloz_starhuatong
歌詞
収録
अंबाबाईचा

उदो उदो !

करुया उदो उदो उदो अंबाबाईचा

(करुया उदो उदो उदो अंबाबाईचा)

मायेचा वाहे झरा, शहरी कोल्हापूरा

मायेचा वाहे झरा, शहरी कोल्हापूरा

घेऊया लाभ दर्शनाचा,

उदो उदो !

करुया उदो उदो उदो अंबाबाईचा

(करुया उदो उदो उदो अंबाबाईचा)

साऱ्या जनतेची आई,

माता अंबाबाई

हाकेला उभी राही,

सारं काही तीच्या ठायी

सत्य डोळ्यांनी पाही,

दंड दुष्टांना देई

अनेक रूपे तीही

घेई भक्तांच्या पायी

आश्विनी प्रथम दिनी,

बसते सिंहासनी

होतो जयघोष माऊलीचा,

उदो उदो !

करुया उदो उदो उदो अंबाबाईचा

(करुया उदो उदो उदो अंबाबाईचा)

तेथुनी जरा दुरी

स्वामीची गगनगिरी

अंश तो परमेश्वरी,

भक्ती दत्ताची खरी

गुहेत स्थान जरी,

बाजुला खोल दरी

रूप ते त्यांचे जणू

शिवशंकरापरी

भेटुया त्यांना चला

पाहुया ईश्वरी लीला

भरे दरबार भाविकांचा,

उदो उदो !

करुया उदो उदो उदो अंबाबाईचा

(करुया उदो उदो उदो अंबाबाईचा)

डोंगरी माथ्यावर

जोतिबांचे मंदिर

जुळती दोन्ही कर

पहाल मूर्ती जर

असे हे कोल्हापूर

नवरात्रीला फार

करिती देवींचा तो

उत्सव घरोघर

सोहळा मनोहर,

रम्य तो खरोखर

सुटे मधुगंध चंदनाचा,

उदो उदो !

करुया उदो उदो उदो अंबाबाईचा

(करुया उदो उदो उदो अंबाबाईचा)

(करुया उदो उदो उदो अंबाबाईचा)

Prahlad Shindeの他の作品

総て見るlogo