वंदनगीत
अल्बम बुद्धविहार
गायक आनंद शिंदे
संगीत मधुकर पाठक
गीतकार प्रतापसिंग बोदडे
तथागताच्या पदकमलावर
तथागताच्या पदकमलावर
काव्यफुले वाहतो
गातो वंदन गीत गातो ( २ )
तथागताच्या पदकमलावर
तथागताच्या पदकमलावर
काव्यफुले वाहतो
गातो वंदन गीत गातो ( २ )
मनामनातील घाणधुतसे, पंचशीलाची नदी
आयुष्याची बाग बहरते ,
बुद्धविहारामधी
त्रिशरणाचे सूर आळविता ( २ )
गर्व इथे लोपतो
गातो वंदनगीत गातो ( २ )
मानव्याच्या मुखी फासला,
कसा कुणी काळीमा
तोच काळीमा पुसून गेली,
वैशाखी पौर्णिमा
मानव्याची वाट निरंतर ( २ )
बुद्ध मला दावतो
गातो, वंदन गीत गातो ( २ )
बुद्धाकडची वाट भिमाने,
काल मला दावली
प्रतापसिंगा मला मिळाली ,
मायेची सावली
या मायेच्या छाये माजी,आनंदे राहतो
गातो वंदन गीत गातो ( २ )
तथागताच्या पदकमलावर
तथागताच्या पदकमलावर
काव्यफुले वाहतो
गातो वंदन गीत गातो
गातो वंदन गीत गातो
गातो वंदन गीत गातो
धन्यवाद
जयभीम