menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Khidkichya Palyad

Sonalee Kulkarnihuatong
nenalove4uhuatong
Lirik
Rakaman
काय असतं त्या खिडकीच्या पल्याड

नक्की काय बर असतं त्या खिडकीच्या पल्याड

एका चौकटीत सामावलेला आकाश

कि आतमधे बंदिस्त झालेले आपण

तळहातावर मावेल इतका सूर्य

कि अभाळभर पसरलेला चंद्र

खरचं नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्याड

बेभान होणारी माणसं

कि जमिनीचा भान ठेवून उंच जाणारे विहंग

आकाशाने उधळलेले रंग

कि आपल्या डोळ्यांना समजणारे चित्र

खरचं नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्याड

बंधन झुगारून कोसळणारा पाऊस

कि डोळ्यात बांधलेला अश्रुंचा पूर

आपल्याला समजलेलं जग

कि आपल्या आज्ञानातलं विश्व

खरचं नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्याड

पण असं एकांतात बसून पडलेले प्रश्न सुटतील कसे

खिडकीच्या पलीकडे बघायचं

तर एकदा तरी या चौकटीतून बाहेर पडावं लागेल

डोळे उघडून हे अथांग आकाश बघावं लागेल

मग कळेल का आपल्याला

खरचं नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्याड

कधी लाटांमधून खळखळणारा हास्य दिसेल

तं कधी हात पसरवून आपल्या बोलावणारा

आपल्याच स्वप्नाच क्षितिज उभं असेल

उंचच-उंच भरारी घ्यायला निळा आभाळ असेल

आणि अंगावर शहारणारा वारा रुचेल

आतातरी कळेल ना आपल्याला

खरचं नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्याड

आणि हे सगळं अनुभवायला

डोळ्याची कवाड कधीतरी उघडायला हवी

मनातले गुंते सुटायला आणि वरती पडलेल्या

प्रश्नांची उत्तर शोधायला एकदा तरी

आपल्या या हृदयाची खिडकी उघडायला हवी

तेव्हाच कळेल आपल्याला

कि नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्याड

खरचं कळेल आपल्याला

कि नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्याड

Lebih Daripada Sonalee Kulkarni

Lihat semualogo