menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Paus Ha Tujha Ni Majha

Sonalee Kulkarnihuatong
mlesure3766huatong
Lirik
Rakaman
वारा उनाड खट्याळ पणे वाहत होता

वेलींच्या त्या बटांना

हलकेच उडवून जात होता

जाता जाता मग, तुला ही श्वासात भरत होता

ढग हि मग गर्दी करू लागले

वाऱ्यावरती स्वार होऊन बरसण्यासाठी

त्या हिरव्यागार पानांमधून

जन्म घेत्या कळ्यांना पाहण्यासाठी

आ आ आ आ हम्म हम्म हम्म हम्म

पाऊस हा तुझा नि माझा

सोबती चा सुखावणारा

रिमझिम रिमझिम या बरसती धारा

हो

पाऊस हा तुझा नि माझा

सोबती चा सुखावणारा

रिमझिम रिमझिम या बरसती धारा बरसती धारा

निशब्द सारे जग होते

नीरव शांतता चहूकडे

पानांची ती एकसुरी सळसळ फक्त

गुणगुणत होती वाऱ्यासवे

पाऊस ही मग त्याला साद घालण्या येता

तुझ्या माझ्या मनाच्या तारा

नकळत कुठेतरी जुळत होत्या

ला ला ला ला ला ला

आणि मग तुझा तो हळुवार स्पर्श

पाण्यामधून निसटत असताना

तुझ्या आठवणींचा गंध मात्र

ह्या पाना फुलांत बहरत होता

क्षणातच सगळं ओलंचिंब करणारा

त्याच्या सोबत तुझ्या मनालाही

वहावत कुठेतरी घेऊन जाणारा

हो पाऊस हा तुझा नि माझा

सोबती चा सुखावणारा

रिमझिम रिमझिम या बरसती धारा बरसती धारा

ओल्या पायवाटांमधून

संथपणे वाहणारा

तुझ्या भावनांचे तरंग

शांतपणे स्वतःवर उमटवणारा

कुणाचीही पर्वा न करता

एकटाच बरसणारा

ते ओले ठसे

मनात कायम जपून ठेवणारा

अनाहूतपणे करून सगळं

मग एकटाच निघून जाणारा

पण

मनाच्या आभाळातून मात्र

कायमचाच बरसत राहणारा

पाऊस पाऊस हा तुझा नि माझा

आ आ आ आ आ आ आ आ

पाऊस हा तुझा नि माझा

सोबती चा सुखावणारा

रिमझिम रिमझिम या बरसती धारा

हो

पाऊस हा तुझा नि माझा

सोबती चा सुखावणारा

रिमझिम रिमझिम या बरसती धारा बरसती धारा

Lebih Daripada Sonalee Kulkarni

Lihat semualogo