menu-iconlogo
logo

Ram janmala ga राम जन्मला गं

logo
avatar
Sudhir Phadke/Marathi Bhktigeetlogo
रविझांबरे💕सुरगंध💕🌷🌷logo
Nyanyi dalam App
Lirik
चैत्रमास, त्यां..त शुद्ध नवमी ही तिथी..

गंधयुक्‍त तरिहि वात उष्ण हे किती..

दोन प्रहरी का गं शिरीं.. सूर्य थांबला आआ

राम जन्मला गं सखी राम जन्मला..

राम जन्मला गं सखी राम जन्मला..

राम जन्मला गं सखी राम जन्मला..

* स्वर-सुधीर फडके*

कौसल्या राणी हळूं,उघडि लोचनें

दिपुन जाय माय स्वतः पुत्रदर्शनें

ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला..

ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला..

राम जन्मला गं सखी राम जन्मला..

राम जन्मला गं सखी राम जन्मला..

*सौजन्य-रविंद्र झांबरे*

राजगृहीं येई नवी,सौख्य पर्वणी

सौख्य पर्वणी

पान्हावुन हंबरल्या,धेनू अंगणी

धेनू अंगणी

दुंदुभिचा नाद तोच,धुंद कोंदला..

दुंदुभिचा नाद तोच,धुंद कोंदला..

राम जन्मला गं सखी राम जन्मला..

राम जन्मला गं सखी राम जन्मला..

?श्रीराम ?

पेंगुळल्या आतपांत,जागत्या कळ्या

'काय काय' करित पुन्हा,उमलल्या खुळ्या..

उच्‍चरवें वायू त्यांस हसून बोलला..

उच्‍चरवें वायू त्यांस हसून बोलला..

राम जन्मला गं सखी राम जन्मला..

राम जन्मला गं सखी राम जन्मला..

?श्रीराम ?

वार्ता ही सुखद जधीं,पोंचली जनी

पोंचली जनी

गेहांतुन राजपथी,धावले कुणी

धावले कुणी

युवतींचा संघ एक,गात चालला..

युवतींचा संघ एक,गात चालला..

राम जन्मला गं सखी राम जन्मला..

राम जन्मला गं सखी राम जन्मला..

?श्रीराम ?

पुष्पांजली फेकी कुणी, कोणी भूषणे..

हास्याने लोपविले,शब्द भाषणे

वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला..

वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला..

राम जन्मला गं सखी राम जन्मला..

राम जन्मला गं सखी राम जन्मला..

?श्रीराम ?

Ram janmala ga राम जन्मला गं oleh Sudhir Phadke/Marathi Bhktigeet - Lirik dan Liputan