menu-iconlogo
huatong
huatong
aadarsh-shinde-bhima-koregaon-cover-image

BHIMA KOREGAON

Aadarsh Shindehuatong
rafoxrafoxhuatong
Тексты
Записи
उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव

गाढिली ती पेशवाई केला वर्मी घाव

Hey, उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव

गाढिली ती पेशवाई केला वर्मी घाव

इतिहासात, इतिहासात

इतिहासात अजरामर शूर महारांचे नाव

भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव

भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव

(भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव)

(भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव)

पेशव्यांसाठी लढा, वाढू द्या आमची शान

तुमचे राजे आम्ही, ठेवा तुम्ही ही जाण

बदले महार काय देता आम्हा सन्मान?

तुमच्यासाठी लावू आमचा प्राणास प्राण

अहंकाराने, अहंकाराने

अहंकाराने चिढला तो पेशव्यांचा बाजीराव

Hey, भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव

भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव

(भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव)

(भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव)

तुच्छ ही जात आहे तुमची अतिशूद्रांची

आस का धरता तुम्ही आमच्याकडे मानाची?

असला शूर तुम्ही, उच्च जात ही आमची

श्वानापरी होत नाही बरोबरी तुमची

अशी कर्मठ त्या, अशी कर्मठ त्या

अशी कर्मठ त्या कावळ्यांनी बघा केली काव-काव

भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव

भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव

(भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव)

(भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव)

इतिहास घडला, लढली स्वाभिमानी ही जात

स्फुर्ती देई आम्हा आमच्या रक्ताचं नातं

धडकले संघरात लढण्यात शिदनात

१८१८ साली दिला पेशव्या धाक

मानवंदनेला, मानवंदनेला

मानवंदनेला योद्धांच्या येता माझे भिमराव

भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव

भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव

(भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव)

(भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव)

(भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव)

(भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव)

(भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव)

(भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव)

(भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव)

Еще от Aadarsh Shinde

Смотреть всеlogo

Тебе Может Понравиться