menu-iconlogo
huatong
huatong
بول
ریکارڈنگز
हा भार सोसेना जड झालाय पिकावानी

अंगात ज्वार भरलं तुझ्या प्रितीच पाज पाणी

हे घुमाजी राव माझा सांगा होणार का धनी

रात्रीला झोप नाही दावी लाव्तीया पापणी

चांद तु पुनावाचा तु ग रूपान गोजिर वाणी

जीव माझा जळतोया होत काळजाचं पाणी पाणी

अगं कोंबडी पळाली तंगडी धरून

लंगडी घालाय लागली (2)

अगं कोंबडी पळाली तंगडी धरून

लंगडी घालाय लागली (2)

पोरं होते मी जवान झाले

ऐन जवानीत बहरून आले

हि सुगंधी धुंद काया भेट देते तुला

मावळा मी मर्द गाडी ग हि मिठीची हीच घडी ग

दे ईशारा इश्क सारा येना माझ्या फुला

तुरू तुरू चालू नको गुलू गुलू बोलू नको

टकमक टकमक पाहू नको सोडून साथ कधी जाऊ नको

प्रेमाची स्टोरी चाल शेतात जाऊ राणी

अन् वाटात सूर भिडलं चल गाऊया गावरान गाणी

ए कोंबडी पळाली इथ भर उडाली

फड फड फडाला लागली

अगं कोंबडी पळाली तंगडी धरून

लंगडी घालाय लागली

अहा कोंबडी पळाली तंगडी धरून

लंगडी घालाय लागली (2)

जीव माझा तुझ्यात जडला

श्वासो श्वासात रुतून पडला

साथ देते सात जन्मी प्रीती देईन तुला

या जीवाची झाली दैना

रातीला मला झोपच येईना

मी तुझा ग झालो मजनू इश्क झाला मला

एsss दिला सबूत आता मोडू नको

मन माझं भोळ सखे तोडू नको

कोंबडी माग फिरू नको घराची कौलं फोडू नको

तुझी माझी जोडी जमली

सुरु झाली या नवी कहाणी

तु माझा फुल राजा मी तुझीच रे फुल राणी

अगं कोंबडी कोंबडी कोंबडी कोंबडी

आ लागली (2)

अहा कोंबडी पळाली तंगडी धरून

लंगडी घालाय लागली

अगं कोंबडी पळाली तंगडी धरून

लंगडी घालाय लागली

Anand Shinde/Vaishali Samant کے مزید گانے

تمام دیکھیںlogo