menu-iconlogo
huatong
huatong
avatar

Ha dhamma ho nava nava (हा धम्म हो नवा नवा )

Ajay Veerhuatong
🌷🌷Ajay🌹Veer🌷🌷huatong
歌词
作品
गीत:- हा धम्म हो नवा नवा

सौजन्य:- अजय वीर

***संगीत***

हा धम्म हो नवा नवा

दुःखा वरील ही दवा

मी सांगतो म्हणून नव्हे

स्वतः तुम्ही अनुभवा

हा धम्म हो नवा नवा

***संगीत***

दुःखाने विश्व सारे हे

तुडुंब भरले आहे रे

व्याधी आणि जरा मरण

तुझीच वाट पाही रे

जीवन प्रवासी मानवा

विसावा शांतीचा हवा

मी सांगतो म्हणून नव्हे

स्वतः तुम्ही अनुभवा

हा धम्म हो नवा नवा

***संगीत***

हा धम्म शिकवितो नीती

मैत्री भावना प्रीती

सत् धम्माची परिनीती

मिळे तयाने सुगती

बंधुभाव वाढवा

वैरभाव मिटवा

मी सांगतो म्हणून नव्हे

स्वतः तुम्ही अनुभवा

हा धम्म हो नवा नवा

***संगीत***

मोहामुळे तृष्णे मुळे

दुःखाची होई निर्मिती

अनेक दुःख वेदना

कुकर्माची परिनीती

जिंका या साऱ्या आश्रवा

दूर ठेवा वैभवा

मी सांगतो म्हणून नव्हे

स्वतः तुम्ही अनुभवा

हा धम्म हो नवा नवा

दुःखा वरील ही दवा

मी सांगतो म्हणून नव्हे

स्वतः तुम्ही अनुभवा

हा धम्म हो नवा नवा

**जय भीम*नमो बुद्धाय**

सौजन्य:- अजय वीर

更多Ajay Veer热歌

查看全部logo
Ha dhamma ho nava nava (हा धम्म हो नवा नवा ) Ajay Veer - 歌词和翻唱