माय पित्यांच्या सावलीतला
काळ सुखाचा ओसरला
लेक चालली सासरला
लेक चालली सासरला
माय पित्यांच्या सावलीतला
काळ सुखाचा ओसरला
लेक चालली सासरला
लेक चालली सासरला
गीत:-अण्णासाहेब देऊळगावकर
संगीत:-राम लक्ष्मण
तळहाताचा करून पाळणा
बाळ सानुली जोजवली
**********
फुलासारखी जपून छकुली
जीव लावून वाढवली
**********
लग्नगाठ बांधून सुकन्या
परक्या हाती सोपवली
सुखात नांदो लेक लाडकी
सुखात नांदो लेक लाडकी
हेच मागणे देवाला
लेक चालली सासरला
लेक चालली सासरला
गायक:- महेन्द्र कपूर
ट्रॅक सौजन्य-गणेश धोटे
गालावरूनी हात फिरवूनी
आई पोटाशी धरते
***********
पोर पोटची झाली परकी
वडिलांचे मन गहिवरते
*********
काळजातली माया ममता डोळ्यामधुनी पाझरते
नव्हेत अश्रू आशीर्वच हे
नव्हेत अश्रू आशीर्वच हे
त्यात अर्थ सगळा भरला
लेक चालली सासरला
लेक चालली
माय पित्यांच्या सावलीतला
काळ सुखाचा ओसरला
लेक चालली सासरला
लेक चालली सासरला