menu-iconlogo
logo

Pahilich Bhet Jhali

logo
歌詞
गीत मंगेश पाडगांवकर

संगीत श्रीनिवास खळे

स्वर अरुण दाते,सुमन कल्याणपूर

गीत प्रकार भावगीत

(पहिलीच भेट झाली)2

पण ओढ ही युगांची

(जादू अशी घडे ही)2

या दोन लोचनांची

जादू अशी घडे ही

Interlude

(पहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा)2

स्वप्‍नात गुंग झाली जागेपणात राधा

(माझी न रहिले मी)2

किमया अशी कुणाची?

(जादू अशी घडे ही)2

या दोन लोचनांची

जादू अशी घडे ही

Interlude

(डोळे मिटून घेता दिसतेस तू समोर)2

(फुलवून पंख स्वप्‍नी अन्‌ नाचतात मोर)2

(झाली फुले सुगंधी)2

माझ्याहि भावनांची

(जादू अशी घडे ही)2

या दोन लोचनांची

जादू अशी घडे ही

Interlude

(लाजून वाजती या अंगातुनी सतारी)2

ऐश्वर्य घेउनी हे ये दैव आज दारी

(मी लागले बघाया)2

स्वप्‍नेहि मीलनाची

(जादू अशी घडे ही)2

या दोन लोचनांची

जादू अशी घडे ही

Interlude

(वार्‍यात ऐकतो मी आता तुझीच गाणी)2

तार्‍यांत वाचतो अन्‌

(या प्रीतिची कहाणी)2

(पहिलीच भेट झाली)2

पण ओढ ही युगांची

(जादू अशी घडे ही)2

या दोन लोचनांची

जादू अशी घडे ही

Pahilich Bhet Jhali Arun Date/Suman Kalyanpur - 歌詞和翻唱