दीनदयाळा हे कृपाळा
गाते तुझ्या अभंगा
धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा
दीनदयाळा हे कृपाळा
गाते तुझ्या अभंगा
धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा
(धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा)
गायिका:- उत्तरा केळकर
ट्रॅक सौजन्य-गणेश धोटे पाटील
पाहिली मी पंढरी ऽ
पाहिली मी पंढरी
चंद्रभागेच्या तीरी नाहले
पाहिला मी श्रीहरी
पाहिला मी श्रीहरी
येऊन जन्मा धन्य जाहले
उद्धराया शुद्ध कराया
माझिया अंतरंगा
धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा
दीनदयाळा हे कृपाळा
गाते तुझ्या अभंगा
धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा
(धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा)
गीतकार:- सोपान कोकाटे
********************
संत तुका चोखोबा
संत तुका चोखोबा
गोरोबा नामा सावता माळी
सखु जनाबाईची
सखु जनाबाईची
भक्ती ही होती साधी भोळी
पुंडलिकापरी सख्या श्रीहरी
भेट दे प्रसंगा
धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा
दीनदयाळा हे कृपाळा
गाते तुझ्या अभंगा
धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा
(धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा)
संगीत:-कमलेश जाधव
ट्रॅक सौजन्य-गणेश धोटे पाटील
सोपानदासा रे
सोपानदासा रे
असू दे हे नाम नित्य अंतरी
संकटसमयी तू
संकटसमयी तू
धावून येई सखा श्रीहरी
नाम स्मरता भजन करता
घुमवित टाळ मृदुंगा
धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा
दीनदयाळा हे कृपाळा
गाते तुझ्या अभंगा
धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा
(धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा)
(धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा)
(धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा)
(धाव घे पांडुरंगा धाव घे पांडुरंगा)