माझ्या भीमाची पुण्याई
आम्हा माणुसकी देई (२)
त्यानं दिधला मार्ग नवा,
साऱ्या विश्वाला बुद्ध हवा (२)
समाजानं होतं ज्याला
टाकीलं दूर
तया पाहुनिया त्याचा
दाटला ऊर
समाजानं होतं ज्याला
टाकीलं दूर
तया पाहुनिया त्याचा
दाटला ऊर
त्यानं दिधला ज्ञान दिवा
साऱ्या विश्वाला बुद्ध हवा
माझ्या भीमाची पुण्याई
आम्हा माणुसकी देई
त्यानं दिधला मार्ग नवा,
साऱ्या विश्वाला बुद्ध हवा
धर्म दंभ जाती पाती
फेकुनि द्यारे
नव्या मानवाचे तुम्ही
प्रेषित व्हा रे
धर्म दंभ जाती पाती
फेकुनि द्यारे
नव्या मानवाचे तुम्ही
प्रेषित व्हा रे
पंचशीलाचे पाईक व्हा
साऱ्या विश्वाला बुद्ध हवा
माझ्या भीमाची पुण्याई
आम्हा माणुसकी देई
त्यानं दिधला मार्ग नवा,
साऱ्या विश्वाला बुद्ध हवा
महापूर आला होता उच्चनीचतेला
द्वेष मत्सराने सारा
देश जळाला
महापूर आला होता उच्चनीचतेला
द्वेष मत्सराने सारा
देश जळाला
आता विझवा हा वणवा
साऱ्या विश्वाला बुद्ध हवा
माझ्या भीमाची पुण्याई
आम्हा माणुसकी देई (२)
त्यानं दिधला मार्ग नवा,
साऱ्या विश्वाला बुद्ध हवा (४)